Posts
Showing posts from August, 2020
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची एबीसी.......
- Get link
- X
- Other Apps
गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षित असलेले नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केले. या धोरणाचा मसुदा तयार करण्याचे काम गेली पाच वर्षे सातत्याने चालू होते.सदरचे शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी अगदी लोकशाही तत्वाचा वापर केला असून सन २०१५ मध्ये यासाठी देशातील अनेक ग्रामपंचायती,नगर परिषदा,इतर स्थानिक स्वराज्य संस्था,शैक्षणिक संस्था,शिक्षक,पालक व इतर शिक्षण तज्ञ यांच्याकडून याबाबत सूचना मागविण्यात आल्या होत्या. मिळालेल्या सूचनांचा अभ्यास करून याचे प्रारूप तयार करण्यसाठी केंद्र सरकारने सन २०१६ मध्ये माजी केंद्रीय सचिव टी.एस.आर.सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. परंतु अंतिम मसुदा तयार करण्यसाठी जून २०१७ मध्ये इस्रो,बंगळूरूचे माजी संचालक आणि जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण केली होती.या समितीनेच या मसुद्यास अंतिम स्वरूप देण्याचे महत्वपूर्ण काम केले. १९८६ नंतर देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल दर्शविणारे आणि एकविसाव्या शतकातील पहिले असे हे शैक्षणिक धोरण महणून याकडे पाहिले जात आहे. यामुळे देशाच्या शिक्षण व्यवस्...