कोरोना : विश्वव्यापक साथीचा कारक विषाणू
डिसेंबर २०१९ च्या अखेरीस चीनच्या वूहान शहरामधून सुरवात करून जगभर पसरत असणारा आणि ज्याची प्रत्येकाने धास्ती खाल्ली आहे असा विषाणू म्हणजे ‘ कोरोना’. जागतिक आरोग्य संघटनेनं नुकतेच ‘कोविड-१९’ या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराच्या साथीला ‘विश्वव्यापक साथीचा रोग ’ म्हणून जाहीर केले. आज या रोगास प्रतिबंध करण्यासाठी साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करावी लागली. अद्याप तरी या रोगास ठोस असे औषध किंवा लस उपलब्ध नाही. परंतु विज्ञानातील प्रगतीमुळे आणि तज्ञांच्या अनुभवाने यावर लवकरच उपाय निघेल असा आशावाद सर्वांनाच आहे. सर्व स्तरावर त्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे या साथीची नोंदही इतिहास जमा होणार असली तरी आज मात्र हे एक नैसर्गिक संकट आपल्यासमोर उभे आहे. विषाणू म्हणले कि माणसाच्या मनात नक्कीच भीती निर्माण होते कारण आतापर्यंत आपणास अनेक प्रकारच्या विषाणूजन्य आजारांना तोंड द्यावे लागले आहे. विषाणूजन्य आजारांना औषधांच्या खूप मर्यादा आहेत. सध्या आपणास ज्या विषाणूशी संघर्ष करावा लागत आहे तो सर्वसामान्यांमध्ये नवीन क...