प्रा.डॉ. गजानन माळी नॅशनल सिनियर टीचर अवॉर्ड ने सन्मानित
प्रा.डॉ. गजानन माळी नॅशनल सिनियर टीचर अवॉर्ड ने सन्मानित.....
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालय, एरंडवणे, पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक डॉ.जी.व्ही.माळी यांना नुकतेच नॅशनल सिनियर टीचर 2023 अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. मायक्रोबायोलॉजीस्टस सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षी सूक्ष्मजीवशास्त्र आणि जैतंत्रज्ञान या विषयातून शैक्षणिक, संशोधनात्मक तसेच सामाजिक असे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्याकाना हा पुरस्कार दिला जातो. मायक्रोबायोलॉजीस्टस सोसायटीच्या निवड समितीने 2023 सालच्या या पुरस्कारासाठी डॉ.जी.व्ही. माळी यांची निवड केली होती.
या पुरस्काराचे वितरण नुकतेच भारथीदासन विद्यापीठ, तिरुचिरापल्ली, तामिळनाडू येथे करण्यात आले. “सूक्ष्मजीवशास्त्रातील संशोधन – वर्तमानातील आव्हाने आणि
भविष्यातील दृष्टीकोन’’ या विषयावर मायक्रोबायोलॉजीस्टस सोसायटी आणि भारथीदासन
विद्यापीठ यांच्या संयुक्त विदयमाने दि. ९ ते ११ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय
परिषदेचे आयोजन या ठिकाणी केले होते. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे
स्वरूप आहे.
सोसायीटीचे अध्यक्ष डॉ अरविंद देशमुख व भारथीदासन विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ एम सेल्वम यांच्या उपस्थितीत जेष्ठ
शास्त्रज्ञ आणि थीरुवल्लूवर विद्यापीठ, वेल्लोर तसेच व्हीआयटी विद्यापीठ ,भोपाल चे
माजी कुलगुरू डॉ पी. गुणसेखरण यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल
रिसर्च आसाम येथील विभागीय केंद्राचे संचालक प्रा.डॉ.के नटराजासिनिवासन उपस्थीत
होते. देश विदेशातील अनेक संशोधक या परिषदेमध्ये सहभागी झाले होते.
डॉ.जी.व्ही.माळी (मूळ गाव – आरग, जि. सांगली) यांनी कडेगाव जि. सांगली येथील भारती विद्यापीठाच्या मातोश्री
बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयातून अध्यापनाची सुरवात केली. येथील सुमारे
28 वर्षाच्या सेवेनंतर, गेल्या दोन
वर्षापासून पुणे येथील यशवंतराव मोहिते महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत
आहेत.
डॉ. माळी यांनी कृषी आणि पर्यावरण सूक्ष्मजीवशास्त्राशी संबधित अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले असून
अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या
सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यास मंडळावर 15 वर्ष सदस्य म्हणून
कार्यरत होते तर सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच भारती
विद्यापिठाच्या अभ्यास मंडळ व संशोधन समिती वर कार्यरत आहेत.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आपला विषय सोप्या भाषेत अवगत व्हावा
यासाठी त्यांनी अनेक पुस्तकांचे लिखाण केले असून
युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी आपला विषय तळागाळातील विद्यार्थ्यापर्यंत
पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. महाराष्ट्र
शासनाच्या विश्वकोश निर्मिती मंडळान मार्फत प्रकाशित करण्यात
येणाऱ्या मराठी विश्वकोशा मध्ये सुध्दा डॉ.
माळी यांनी आपल्या विषयाचे मराठीतून लिखाण करून योगदान दिले आहे. कोरोनाच्या काळात वृत्तपत्र व आकाशवाणीच्या माध्यमातून
जनजागृतीचे काम देखील माळी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता आणि वर्तमान
परिस्थिती तसेच नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मध्ये
संशोधनाची वृत्ती जागृत करून त्यांच्या विचार आणि कृतीला वाव देण्याचे कार्य डॉ
माळी यांनी नेहमीच केले आहे. या सर्व गोष्टींची दखल घेवून मायक्रोबायोलॉजीस्टस
सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट
पुरस्कार डॉ माळी यांना देण्यात आला असे यावेळी बोलताना मायक्रोबायोलॉजीस्टस
सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ अरविंद देशमुख म्हणाले.
मायक्रोबायोलॉजीस्टस सोसायटीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून देशभरात व देशाबाहेर विविध उपक्रम राबविले जातात. या विषयाशी संबधित राष्ट्रिय तसेच आंतरराराष्ट्रीय चर्चासत्रे , परिसंवाद तसेच व्याख्यानांच आयोजन, विविध स्पर्धा, संशोधनासाठी शिष्यवृत्ती, सामंजस्य करार , सामाजिक उपक्रम इ. राबविले जातात. शासन व विद्यापीठ पातळीवरील या विषयाशी संबंधित अनेक प्रश्न या सोसायटी च्या वतीने सोडविण्यात आले आहेत.
भारती विद्यापीठाचे संस्थापक मा.डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांचा आदर्श समोर ठेवून , कार्यवाह मा. डॉ विश्वजित कदम साहेब आणि कुलपती डॉ शिवाजीराव कदम सर यांच्या प्रेरणने, सर्वसामान्य विद्यार्थ्याचे हित डोळ्यासमोर ठेवून शिक्षण क्षेत्रात काम केल्यामुळेच हा पुरस्कार मला प्राप्त झाला अश्या भावना डॉ माळी यांनी यावेळी व्यक्त केल्या.
Comments
Post a Comment